”वेळ”एका श्रीमंत व्यक्तीची गोष्ट

”वेळ”एका श्रीमंत व्यक्तीची गोष्ट

वेळ

 एक खूप श्रीमंत आणि स्वार्थी शेठ होता. नेहमी संपत्ती आणि पैसा कमवायच्या मागे आपला संपूर्ण वेळ घालवायचा. त्यामुळे या शेठ ने आपले आयुष्य नेहमी पैसा कमावण्यात घातले. त्याने इतका पैसा कमवला होता की त्याला जे हवं ते घेऊ शकत होता. पण तो शेठ पैसा कमावण्याच्या मध्ये इतका गुंतला होता की त्याने आपल्या आयुष्यामध्ये स्वतची हौस मौज केली नव्हती. कधी स्वतःला कपडे घेतले नव्हते.

तर कधी विदेशात फिरायला गेला नव्हता. तर कधी चांगले पदार्थ पण खाल्ले नव्हते. कारण हा शेठ खूप कंजूसपणा व नेहमी एक एक पैसा वाचवत होता. शेठ चे जीवन असे चालू होते. त्यामुळे पैसा कमावण्याच्या नादात त्याच्या आयुष्य संपुष्टात येते व तो म्हातारा होतो.

शेवटी त्याच्या आयुष्यातील शेवटचा दिवस येतो आणि त्या रात्री यमराज त्या शेठला घेऊन जायला येतो. यमराज शेठला म्हणतो की तुला माझ्यासोबत यावं लागेल. कारण आता तुझ्या मृत्यूची वेळ झाली आहे. तेव्हा शेठ यमराज ला घाबरून म्हणतो की मी तर माझे आयुष्य चांगल्या प्रकारे जगलो पण नाही. पैसे कमवता कमवता म्हातारपण कसे आले हे पण कळलं नाही. मला माझे पैसे खर्च करण्यासाठी थोडा वेळ द्या.

असे सर्व बोलत शेठ यमराजाकडून काही दिवसांचा वेळ मागतो. पण यमराज मात्र शेठला म्हणत असतो तुझा आस मृत्यू निश्चित आहे. तुझा मृत्यू आता तू पुढे ढकलू शकत नाही. तुझे दिवस आणि तुझा वेळ संपला आहे. तेव्हा तो शेठ यमराजाला विनंती करून विचारतो की मी माझ्या संपत्तीतील 90% धन तुम्हाला देतो. पण मला एक महिन्याची मुदत द्या. माझ्या आयुष्यात जी काही धनदौलत कमवायच्या नादात जी काही हौस मौज केली नाही.

ती सगळी मला करून घ्यायची आहे. तेव्हा यमराज शेठला साफ नकार देत म्हणतो मी की तुला कोणत्याही कोणत्याही प्रकारचा वेळ देऊ शकत तेव्हा तो यमराजाला पुन्हा एकदा तो यमराजाला विनंती करतो की तुम्हाला माझी सगळी धन दौलत देतो. पण मला निदान एक दिवसाचा तरी वेळ द्या. तेव्हा यमराज त्या शेठला म्हणतो की मी तुला एक तासाचा सुद्धा वेळ देऊ शकत नाही.

एक गोष्ट लक्षात ठेव तू तुझ्या वेळेकडच्या उपयोग करून पैसा कमवू शकतो. पण पैशाचा उपयोग करून वेळ नाही कमवू शकत. असे म्हणून यमराज त्या शेठला घेऊन जातो. तेव्हा त्या शेठला सुद्धा आपल्या स्वार्थी पणावर खूपच पश्चाताप होत असेल. व माझ्या आयुष्यातील सगळे दंडवत देऊन सुद्धा मी एक मिनिटाचा वेळसुद्धा विकत घेऊ शकलो नाही.

 त्यामुळे मित्रांनो शेठ प्रमाणे आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूपच धावत असतो दौलत कमावण्याच्या नादात स्वतःसाठी जगणं विसरून जातो. आपण हा विचार करतो की आज काम करून भविष्यात आराम करू. पण उद्याचा दिवस कधीच येऊ शकत नाही. उद्याचा दिवस हा फक्त आपला एक विचार आहे. त्यामुळे उद्याच्या दिवसाची वाट माणसाचं आयुष्य कधी संपून जात हे माणसाला कळत सुद्धा नाही.

त्यामुळे मित्रांनो आजचा दिवस आनंदाने जगायला शिका. कारण नेहमी आजचा व वर्तमानाचा दिवसच आपल्या सोबत असतो.

तात्पर्य :- मित्रांनो पैसा माणसाला वर नेऊ शकतो पण माणूस कधीच पैशाला वर घेऊन शकत नाही

Leave a Comment